अ‍ॅपशहर

मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा: काँग्रेस

मराठा आरक्षणाबाबत ठोस मार्ग काढण्यासाठी मुंबईत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून वेळकाढूपणा केल्यानेच राज्यात उद्रेक झाला आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जनतेची माफी मागावी असे आवाहनही चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2018, 5:24 pm
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashok-chavan


मराठा आरक्षणाबाबत ठोस मार्ग काढण्यासाठी मुंबईत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून वेळकाढूपणा केल्यानेच राज्यात उद्रेक झाला आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जनतेची माफी मागावी असे आवाहनही चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केले. मराठा संघटनाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत होते.

हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याऐवजी मराठा संघटनाच्या नेत्यांनी चर्चेला यावे, आपण तयार आहोत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची ही भूमिका फेटाळून लावली आहे. आतापर्यंत बऱ्याच चर्चा झाल्या असून आता कृती करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. म्हणून उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवणे गरजेचे असल्याचे चव्हाण म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्ये करणे सोडावे'

मराठा समाजाच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले. सरकारने मराठी समाजाची फसवणूक केली असल्याचे म्हणत मुख्यंमंत्र्यांनी बेताल वक्तव्ये करणे सोडून द्यावे असे आवाहनही चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज