अ‍ॅपशहर

...तर संजय दत्तला पुन्हा तुरुंगात पाठवू!

१९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात झालेली तुरुंगवासाची शिक्षा भोगून आलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय दत्तला शिक्षेत सूट देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं हायकोर्टाला वाटत असेल तर त्याला तुरुंगात परत पाठवता येईल, अशी भूमिका आज राज्य सरकारनं मांडली आहे.

Maharashtra Times 27 Jul 2017, 3:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम can send dutt back to jail if rules broken maha govt
...तर संजय दत्तला पुन्हा तुरुंगात पाठवू!


१९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात झालेली तुरुंगवासाची शिक्षा भोगून आलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय दत्तला शिक्षेत सूट देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं हायकोर्टाला वाटत असेल तर त्याला तुरुंगात परत पाठवता येईल, अशी भूमिका आज राज्य सरकारनं मांडली आहे.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या संजय दत्तची आठ महिने लवकर सुटका करण्यात आली होती. कारागृहातील चांगलं वर्तन आणि शिस्तपालन या बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर शंका उपस्थित करत पुण्यातील प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. संजय दत्तचं कारागृहातील वर्तन चांगलं होतं. शैक्षणिक उपक्रम, शारीरिक प्रशिक्षण यासह त्याला दिलेलं प्रत्येक काम त्याने उत्तमरित्या पार पाडलं. त्यामुळे नियमांनुसारच शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधी त्याची सुटका करण्यात आली, असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं होतं.

त्यानंतर, या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीवेळी, संजय दत्तची फर्लो आणि पॅरोलवर सुटका करण्याच्या राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाच्या निर्णयावर हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. संजय दत्तला पॅरोल का दिले याबाबत दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र देण्याचा आदेशही न्या. आर एम सावंत आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने दिला. त्यावर, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी संजय दत्तला धडकी भरवणारी भूमिका घेतली. हायकोर्टाला राज्य सरकारचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर आम्ही संजय दत्तला पुन्हा तुरुंगात टाकण्याचे आदेश देऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता कोर्ट काय आदेश देतं, यावर संजय दत्तचं भवितव्य अवलंबून असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज