अ‍ॅपशहर

अंधेरी उड्डाणपुलावर कारला आग

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी उड्डाणपुलावर आज दुपारी १२च्या सुमारास एका कारनं अचानक पेट घेतला. हा भडका इतका भीषण होता की, काही मिनिटांतच कार जळून खाक झाली.

Maharashtra Times 19 Jul 2017, 12:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम car catches fire on andheri flyover near metro station
अंधेरी उड्डाणपुलावर कारला आग


पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी उड्डाणपुलावर आज दुपारी १२च्या सुमारास एका कारनं अचानक पेट घेतला. हा भडका इतका भीषण होता की, काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे जोगेश्वरीकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबई मेट्रोवरील पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकाच्या खालून अंधेरीचा उड्डाणपूल जातो. तिथेच ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आली, त्यांचे बंब लगेच रवानाही झाले, पण तोपर्यंत कार आगीचं भक्ष्य झाली होती. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली.

कारला आग नेमकी कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज