अ‍ॅपशहर

'सामना'च्या व्यंगचित्रकाराचा माफीनामा

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून मराठा समाजाच्या अतिविराट मोर्चांवर व्यंगचित्र काढणारे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 'कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,' असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 28 Sep 2016, 11:25 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cartoonist prabhudesai apologize for cartoon in saamana
'सामना'च्या व्यंगचित्रकाराचा माफीनामा


शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून मराठा समाजाच्या अतिविराट मोर्चांवर व्यंगचित्र काढणारे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 'कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'सामना'नं पहिल्याच पानावर त्यांचा हा खुलासा प्रसिद्ध केला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांत सध्या विराट मोर्चे निघत आहेत. या मोर्चांचा संदर्भ घेऊन प्रभुदेसाई यांनी 'सामना'च्या उत्सव पुरवणीत व्यंगचित्र रेखाटलं होतं. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटले. 'सामना'च्या नवी मुंबई व ठाणे येथील कार्यालयांवर दगडफेक व शाईहल्ला झाला. विरोधी पक्षांनी शिवसेनेला लक्ष्य करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर माफीची मागणी केली. उद्धव यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज प्रभुदेसाई यांनी मुखपत्रातून दिलगिरी व्यक्त केली आहे.

‘व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो. २५ सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो. या सर्व प्रकरणाचे राजकारण झाले व त्यात ‘शिवसेना’ व ‘सामना’स ओढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्यामुळेच हा खुलासा करीत असल्याचे श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज