मुंबई : अभिनेत्री रती अग्निहोत्री यांच्या वरळी येथील घरात मीटरमध्ये फेरफार करून ४९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुरुवारी बेस्ट प्रशासनाने वरळी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाच बेस्टच्या दक्षता पथकाने कारवाई करत ही वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी रती अग्निहोत्री व पती अनिलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रती अग्निहोत्रीवर वीजचोरीचा गुन्हा
अभिनेत्री रती अग्निहोत्री यांच्या वरळी येथील घरात मीटरमध्ये फेरफार करून ४९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुरुवारी बेस्ट प्रशासनाने वरळी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
Maharashtra Times 20 Jan 2017, 7:04 am