अ‍ॅपशहर

बोगस डॉक्टरच्या इंजेक्शनमुळे मृत्यू

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, मागील अनेक वर्षांपासून देवनारमध्ये दवाखाना उघडून नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या बोगस डॉक्टरने दिलेल्या इजेक्शनच्या दुष्परिणामामुळे २५वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले असून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 11 Nov 2017, 6:58 am
मुंबई : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, मागील अनेक वर्षांपासून देवनारमध्ये दवाखाना उघडून नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या बोगस डॉक्टरने दिलेल्या इजेक्शनच्या दुष्परिणामामुळे २५वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आले असून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम case files against fake doctor
बोगस डॉक्टरच्या इंजेक्शनमुळे मृत्यू


देवनार परिसरात राहणाऱ्या प्रदीप आनंद जाधव याची तब्येत काही दिवसांपासून बिघडली होती. त्यामुळे उपचारासाठी तो देवनार येथील बोगस डॉक्टर शाहबाज आलम मोहम्मद हारून सिद्दिकी उर्फ शेख याच्याकडे गेला. शेख याने त्याला इंजेक्शन दिले. मात्र त्याची प्रदीपला बाधा झाली. त्याची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला. प्रदीपच्या पोस्टमॉर्टेममध्ये इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयाने देवनार पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. शेख याच्याकडे प्रदीप उपचारासाठी गेला होता व शेख याने दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याची प्रकृती खालावल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शेख याची चौकशी केली. त्याच्याकडे कोणतीही पदवी नसताना तो डॅाक्टर असल्याचे भासवत क्लिनिक चालवत असल्याचे निदर्शनास आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज