अ‍ॅपशहर

बँकांची रोकडमर्यादा रद्द

बँक बचत खात्यातून तसेच एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा सोमवारपासून काढून टाकण्यात आली. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा घातली होती. खात्यातून दर आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा २० फेब्रुवारी रोजी ५० हजार रुपयांवर नेण्यात आली. त्यानंतर आता ही मर्यादा पूर्णपणे हटवण्यात आली आहे. ही घोषणा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी केली आहे.

Maharashtra Times 14 Mar 2017, 4:02 am
मुंबई ः बँक बचत खात्यातून तसेच एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा सोमवारपासून काढून टाकण्यात आली. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा घातली होती. खात्यातून दर आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा २० फेब्रुवारी रोजी ५० हजार रुपयांवर नेण्यात आली. त्यानंतर आता ही मर्यादा पूर्णपणे हटवण्यात आली आहे. ही घोषणा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cash limit in banks atms cancelled
बँकांची रोकडमर्यादा रद्द


बँकेचे चालू खाते, ओव्हरड्राफ्ट व कॅश क्रेडिट यांची रोकड काढण्याची मर्यादा यापूर्वी १ फेब्रुवारीपासूनच संपुष्टात आणण्यात आली. नोटाबंदी लागू झाल्यावर एटीएममधून सुरुवातीला अडीच हजार रुपये काढता येत होते. त्यानंतर साडेचार हजार रुपये काढण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली. ही मर्यादा वाढवून १० हजार रुपये करण्यात आली. आता बचत खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा काढून टाकल्यामुळे साहजिकच एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादाही काढली गेली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज