अ‍ॅपशहर

गणेशोत्सवामुळं मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

रेल्वे रुळ दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेकडून दर रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times 4 Sep 2016, 10:53 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central railway cancells mega block
गणेशोत्सवामुळं मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

रेल्वे रुळ दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेकडून दर रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध बाजार फुलले आहेत. मुंबईसह उपनरातून तसंच, ठाणे, बदलापूरपासून लोक दादर, लालबागसारख्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात. गावाकडे जाण्यासाठी लोकांची लगबग सुरू असल्यानं खरेदीला उधाण आलं आहे. गणेशोत्सवाचा आदला दिवस, तोही रविवार असल्यानं आज मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी बाहेर पडणार हे स्पष्ट आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं आजचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळं मुंबई व ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज