अ‍ॅपशहर

एक्स्प्रेस बिघाडांमुळेमध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेवरील वाहतुकीला मंगळवारी दोन एक्स्प्रेसमधील बिघाडांचा फटका बसला. सकाळी कल्याण येथे पंचवटी एक्स्प्रेस आणि टिटवाळा येथे राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने सायंकाळपर्यंत

Maharashtra Times 22 Aug 2018, 4:49 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panchavati-express


मध्य रेल्वेवरील वाहतुकीला मंगळवारी दोन एक्स्प्रेसमधील बिघाडांचा फटका बसला. सकाळी कल्याण येथे पंचवटी एक्स्प्रेस आणि टिटवाळा येथे राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने सायंकाळपर्यंत 'मरे'वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मध्य रेल्वेवर सकाळी ९च्या सुमारास नाशिकहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचा 'एअर पाइप' त्यामागील डब्यांपासून वेगळा झाला. इंजिनच डब्यांपासून अलग झाल्याने कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर ही एक्स्प्रेस अडली. त्यामुळे कल्याणपुढील स्थानकांकडून येणाऱ्या लोकलही थांबून राहिल्या. पाठोपाठ टिटवाळ्याजवळ राज्यराणी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्येही बिघाड झाला. ही एक्स्प्रेस कल्याणजवळ अडकल्याने आणखी गोंधळ उडाला. दुपारनंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्नही तोकडे पडल्याने सायंकाळपर्यंत 'मरे'वरील सर्वच लोकल उशिराने धावत होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज