अ‍ॅपशहर

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे आर्धा तास उशिराने सुरू आहे. यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांचा संताप झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2019, 9:59 am
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम local-train

ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे आर्धा तास उशिराने सुरू आहे. यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांचा संताप झाला.

नेरळजवळ दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ही घटना घडल्याने कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या काही गाड्या बदलापूरपर्यंतच चालवण्यात आल्या. बदलापूर तसंच अंबरनाथमधून सीएसएमटीकडे जाणारी लोकलची वाहतूक सुरू आहे. मात्र तांत्रिक बिघाडाचा फटका कर्जत आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांना बसला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक जवळपास आर्धा तास उशिराने सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज