अ‍ॅपशहर

कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडा; 'मरे' विस्कळीत

मटा ऑनलाइन वृत्त। मुंबईकुर्ला स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची ठाण्याच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुळ दुरूस्त केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. मात्र, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती.

Maharashtra Times 21 Dec 2016, 1:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central railway local train delay due to rail fracture near kurla station
कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडा; 'मरे' विस्कळीत


कुर्ला स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची ठाण्याच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुळ दुरूस्त केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. मात्र, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती.

मध्य रेल्वेची धीमी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कुर्ला स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. रुळ दुरुस्त केल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज