अ‍ॅपशहर

मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आज पाचव्या दिवशीही विस्कळीत झाली झाल्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाला. शॉर्ट सर्किटमुळे कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर काही तासांनी ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 3:38 pm
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम local-trains-late-maharasht

मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आज पाचव्या दिवशीही विस्कळीत झाली झाल्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाला. शॉर्ट सर्किटमुळे कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर काही तासांनी ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे.

या मुळे दोन्ही दिशेकडील जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकलना काही काळ नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार येथे थांबा दिला जात नव्हता. तसेच, या लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र, आता वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे.

दरम्यान, काल सकाळीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. या मुळे डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या गर्दी झाली होती. तत्पूर्वी, बुधवारीही (१२ जून) कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू होती. मंगळवारी ११ जून रोजीही कल्याणहून मुंबईला येणाऱ्या लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मंगळवारी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तत्पूर्वी, सोमवारीही चाकरमान्यांची सुरुवात मनस्तापानेच झाली होती. सोमवारी पावसाचा फटका बसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज