अ‍ॅपशहर

​ ‘लोकल’गोंधळ सुरूच

मध्य रेल्वेवर सलग काही दिवस लोकल सेवेचा गोंधळ सुरू असून गुरुवारी त्यात मेल/एक्स्प्रेस सेवेच्या विलंबाची भर पडली. मंकी हिल येथे मालगाडी घसरल्यानंतर सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे शुक्रवारीही काही मेल/एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या.

Maharashtra Times 15 Sep 2017, 4:02 am
मुंबई : मध्य रेल्वेवर सलग काही दिवस लोकल सेवेचा गोंधळ सुरू असून गुरुवारी त्यात मेल/एक्स्प्रेस सेवेच्या विलंबाची भर पडली. मंकी हिल येथे मालगाडी घसरल्यानंतर सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे शुक्रवारीही काही मेल/एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. या साऱ्यात लांब पल्ल्यांच्या सेवा उश‌रिाने होत असल्याचा परिणाम लोकल सेवेवर पाहायला मिळाला. त्यामुळे गुरुवारीही काही लोकल एक तास उशिराने धावत असल्याची प्रवाशांची तक्रार होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central railway problem continues
​ ‘लोकल’गोंधळ सुरूच


मध्य रेल्वेवर बुधवारपाठोपाठ गुरुवारीही लोकल सेवेचा गोंधळ कायम होता. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळेस अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अशातच, मंकी हिल येथे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मेल/एक्स्प्रेस सेवांवर परिणाम झाला आहे. अशातच मुंबईकडे ये-जा करणाऱ्या मेल/एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचा सरळ फटका लोकल सेवांना बसल्याचे सांगण्यात येते. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-डेक्क्न एक्स्प्रेस, कर्जत-पुणे शटल रद्द करण्यात आल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज