अ‍ॅपशहर

कल्याण लोकलच्या पेंटाग्राफला आग

दादरहून कल्याणला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याचा भीषण प्रकार आज घडल्यानं रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर, मध्य रेल्वेची वाहतूक आज सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली असून नोकरदारांचे हाल होत आहेत.

Maharashtra Times 22 Nov 2016, 7:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central railway services hit following fire in pantagraph
कल्याण लोकलच्या पेंटाग्राफला आग


दादरहून कल्याणला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याचा भीषण प्रकार आज घडल्यानं रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर, मध्य रेल्वेची वाहतूक आज सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली असून नोकरदारांचे हाल होत आहेत.

कल्याणला जाणाऱ्या जलद लोकलनं कुर्ला स्टेशन सोडलं, तेव्हा ट्रेनच्या मागील पेंटाग्राफला आग लागली होती. लोकल भांडूपला पोहोचेपर्यंत ती चांगलीच भडकली. टपावरून येणारा धूर पाहून प्रवासीही घाबरले. अनेक डब्यांमध्ये गोंधळ उडाला. अखेर, ठाणे स्टेशनात ही लोकल थांबली, तेव्हा सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. अर्थात, आगीचा चांगलाच भडका उडालेला असल्यानं त्यावर वेगानं नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.

दरम्यान, या प्रकारामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोऱ्या वाजला. कळवा स्टेशनाजवळ रुळाला तडा गेल्यानं काल संध्याकाळीही घरी परतणाऱ्या नोकरदारांचा खोळंबा झाला होता. त्यानंतर आज पेंटाग्राफच्या बिघाडामुळे ते रखडले. आग विझवल्यानंतर लोकल लगेचच प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आली, पण 'मरे'ची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज