अ‍ॅपशहर

मध्य रेल्वे खोळंबली

कांजूरमार्ग स्थानकाजवळ अप धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या...

Maharashtra Times 12 Dec 2018, 4:00 am

मुंबई : कांजूरमार्ग स्थानकाजवळ अप धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या. बिघाडामुळे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ठाणे-सीएसएमटी लोकल सुमारे २० मिनिटे रखडल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. यामुळे गर्दीच्या काळात लोकल रखडल्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना सुमारे १५ ते २० मिनिटांचा लेटमार्क लागला. दरम्यान कांजूरमार्ग तांत्रिक बिघाडाबाबत नियंत्रण कक्षाकडून कोणताही संदेश आला नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज