अ‍ॅपशहर

कार्यालयाच्या वेळा बदलण्यासाठी सर्वेक्षण

मुंबई आणि परिसरातील प्रचंड गर्दीवर उपाय म्हणून कार्यालयीन वेळा बदलण्याच्या सूचनेची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी रेल्वेने 'राईटस' (भारतीय रेल्वे टेक्निकल अँड इंजिनीअरिंग सर्व्हिस)ला पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Times 27 Aug 2016, 12:48 am
hemant.satam@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम change in office timings
कार्यालयाच्या वेळा बदलण्यासाठी सर्वेक्षण


मुंबई : मुंबई आणि परिसरातील प्रचंड गर्दीवर उपाय म्हणून कार्यालयीन वेळा बदलण्याच्या सूचनेची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी रेल्वेने 'राईटस' (भारतीय रेल्वे टेक्निकल अँड इंजिनीअरिंग सर्व्हिस)ला पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत गर्दीच्या वेळेस एकाच दिशेने प्रवासी ये-जा करतात. ही स्थिती बदलण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची भूमिका रेल्वेने मांडली आहे.

य पाहणीत प्रामुख्याने सरकारी कार्यालयांसह खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांच्या वेळांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात, ‘राईटस’चे अधिकारी प्रवासी आणि विविध स्तरावर कार्यालयांशी संवाद साधून सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर राज्य सरकारला अहवाल सुपूर्द करण्यात येणार आहे. लोकलच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदलण्याविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा केली आहे. या सर्वेक्षणातून प्रवाशांची मानसिकता आणि भूमिका लक्षात येण्यास मदत होणार आहे. ह्या अहवालानंतर त्यासंदर्भात अधिक पर्याय तपासले जाणार असल्याचे अधिकारी सांगतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज