अ‍ॅपशहर

राष्ट्रवादी म्हणते; 'या' तालुक्याचं नामकरण 'राजगड' करा!

बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड असं नाव द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 6:07 pm

सर्व शाळांत इयत्ता १०वीपर्यंत मराठी सक्तीची; विधेयक मंजूर


दिल्ली हिंसाचार: शहांनी राजीनामा द्यावा- सुळे

मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड असं नाव द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supriya-sule


छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे राजगड हा किल्ला वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच वेल्हा तालुक्यात हा किल्ला असल्याने किल्ल्याचे नाव वेल्हा तालुक्याला देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असं या पत्रात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

राज्यातले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त

जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत 'राजगड तालुका' असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती, अशी मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मागच्या सरकारच्या काळातही पत्राद्वारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली होती, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करूनही त्याबाबतची माहिती दिली आहे.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज