अ‍ॅपशहर

भुजबळांनी दमानियांचे आरोप फेटाळले

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कारागृहातून पत्र लिहून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या संदर्भात वकिलाचा सल्ला घेऊन दमानिया यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, असा इशाराही भुजबळ यांनी या पत्रात दिला आहे.

Maharashtra Times 17 May 2017, 10:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chhagan bhujbal rejected all allegations of vip treatment in jail
भुजबळांनी दमानियांचे आरोप फेटाळले


राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कारागृहातून पत्र लिहून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या संदर्भात वकिलाचा सल्ला घेऊन दमानिया यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, असा इशाराही भुजबळ यांनी या पत्रात दिला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा, बेहिशेबी मालमत्ता तसेच मनी लॉन्डरिंग प्रकरणी अटक झालेले छगन भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे सुद्धा कारागृहातच आहेत. या दोघांनाही 'व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. तशी तक्रार त्यांनी आर्थर रोड कारागृहाचे अतिरिक्त कारागृह अधीक्षकांकडे केली आहे. त्यावर भुजबळ यांनी करागृहातून स्पष्टीकरण दिलं असून दमानिया यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. भुजबळ यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात हे पत्र लिहिले आहे.

आम्हाला जामीन मिळू नये, रुग्णालयात उपचार मिळू नयेत म्हणूनच हा सगळा खोडसाळपणा चालला आहे. विरोधक आमच्या जिवावर उठले आहेत. अंजली दमानिया यांनी हे सगळं करण्याचं कंत्राट घेतलं आहे, असा आरोप भुजबळ यांच्या पत्रात करण्यात आला आहे. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास दमानिया यांचे आरोप किती खोटारडे आहेत, हे स्पष्ट होईल, असेही भुजबळ यांनी पुढे नमूद केले आहे.



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज