अ‍ॅपशहर

तब्येतीची काळजी घ्या, पवारांचा भुजबळांना सल्ला

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी भुजबळांना आराम करण्याचा सल्ला दिला. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली, पण त्याचा तपशील कळू शकला नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2018, 12:40 pm
मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी भुजबळांना आराम करण्याचा सल्ला दिला. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली, पण त्याचा तपशील कळू शकला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chhagan bhujbal to met sharad pawar at his residence silver oak
तब्येतीची काळजी घ्या, पवारांचा भुजबळांना सल्ला


जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. काल गुरुवारी भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर भुजबळांनी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल दोन वर्षानंतर भुजबळांनी पवार यांची भेट घेतल्यानं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत भुजबळांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र वडीलकीच्या नात्याने पवारांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं भुजबळांनी आवर्जुन सांगितलं.

दरम्यान, काल पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवार यांचा आल्याचं सांगितलं होतं. त्यापार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कालच्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी शिवसेनेचेही आभार मानले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज