अ‍ॅपशहर

शिवस्मारकाला गती द्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच अरबी समुद्रातील स्मारकासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू होईल, याचे नियोजन करावे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला.

Maharashtra Times 28 Jan 2018, 1:00 am

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच अरबी समुद्रातील स्मारकासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू होईल, याचे नियोजन करावे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. या स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, अतिरिक्त मुख्य सचिव डी. जे. जैन, अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय, अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, प्रधान सचिव आशीषकुमार सिंग, सचिव अजित सगणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. यासाठी प्राधिकृत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीला आता या कामातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला वेगाने सुरुवात करता येईल असे नियोजन करावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज