अ‍ॅपशहर

​ सरन्यायाधीश शनिवारी मुंबईत

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सात विविध नव्या योजनांच्या अंमलबजावणी व जनजागृतीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार आहे.

Maharashtra Times 23 Sep 2016, 4:33 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chief justice in mumbai on saturday
​ सरन्यायाधीश शनिवारी मुंबईत


सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सात विविध नव्या योजनांच्या अंमलबजावणी व जनजागृतीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित या कार्यक्रमात सरन्यायाधीश ठाकूर यांच्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. आर. दवे व न्यायमूर्ती एस.

ए. बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्यायमू्र्ती

तथा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष व्ही. एम. कानडे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नंतर योजनांचा उद्देश व उपयुक्तता याविषयी मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांतील प्रधान न्यायाधीशांची व्याख्याने होणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज