कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी व मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णी याची रवानगी मुंबईतील सत्र न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत केली आहे. कुलकर्णी हा या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीच्या हाँगकाँगमधील बनावट कंपनीचा संचालक होता. तो सोमवारी कोलकाताच्या विमानतळावर येताच ईडीने त्याला अटक करून तेथील न्यायालयाकडून त्याची तीन दिवसांची 'ट्रान्झिट' कोठडी मिळवली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले.
चोक्सीच्या सहकाऱ्याला कोठडी
कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी व मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णी याची रवानगी मुंबईतील सत्र न्यायालयाने १२ ...
Maharashtra Times 10 Nov 2018, 4:00 am