अ‍ॅपशहर

भाजप-शिवसेनेचे खासदार आज आमनेसामने

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमनेसामने येणार आहेत. त्यावेळी ते एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

Maharashtra Times 27 Jan 2017, 8:34 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm devendra fadnavis calls state mps meeting regarding union budget
भाजप-शिवसेनेचे खासदार आज आमनेसामने


केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यावेळी ते एकमेकांशी कसे वागतात, बोलतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. शिवसेनेचे खासदार बैठकीला जाणार का, अशीही शंका व्यक्त होतेय.

संसदेच्या प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील खासदारांबरोबर बैठक घेऊन राज्याच्या समस्या केंद्राकडे कशा आक्रमक पद्धतीने मांडता येतील यावर चर्चा करतात. यंदाचं बजेट १ फेब्रुवारीला सादर होणार असून त्यात महाराष्ट्राला काय मिळणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. परंतु, युती तुटल्याच्या घोषणेनंतर, शिवसेना खासदार अधिवेशनात काय पवित्रा घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं बारीक लक्ष आहे. त्यांच्या भूमिकेचा अंदाज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत येऊ शकतो.

अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्याला आता अधिकच धार येणार आहे. त्याची सुरुवात आजच्या बैठकीपासूनच होऊ शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज