अ‍ॅपशहर

शिंदेंची 'ती' दिल्लीवारी रद्द झालीच नव्हती; शाहांसोबतच्या 'गुप्त'भेटीत काय काय ठरलं?

cm eknath shinde done secret meeting bjp leader amit shah: गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचवेळा दिल्लीवारी केली आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप तरी सुटलेला नाही.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2022, 10:44 am
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झाले आणि यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून गुरुवारी पहाटे मुंबईला परत गेल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shinde and shah
एकनाथ शिंदे आणि अमित शाह


गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचवेळा दिल्लीवारी केली आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप तरी सुटलेला नाही.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याने रिक्त, विधानपरिषदेच्या जागेसाठी शिंदे गटाचा उमेदवारही ठरला?
बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे आता उघड झाले आहे. सांगण्यात आले, परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कुणीही नव्हते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात किती सदस्य असावे, तसेच मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा, यावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माध्यमांना हुलकावणी देण्यासाठी दौरा रद्द झाल्याची बातमी पेरण्यात आल्याचे समजते.
मंत्रिमंडळातून वगळण्याची धास्ती? अब्दुल सत्तारांनी दिल्ली गाठली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गुरुवारी दुपारी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.

दोन-तीन दिवसांत विस्तार- गिरीश महाजन
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसातच होईल, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना केला. ते सध्या दिल्लीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज