अ‍ॅपशहर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनांना टोलमाफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

Mumbai Pune Express Highway Today News : बुधवारी, ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून साहजिकच शनिवारपासूनच अनेक चाकरमान्यांनी गावाकडे जाण्याची वाट धरली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2022, 7:19 am
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाऊ नये, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai pune express toll news updates
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट येथे वाहतूककोंडी होताना दिसत आहे. अमृतांजन पुलाजवळ एक ते दीड किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलग सुट्ट्या, आठवड्याचा शेवट आणि गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांची गर्दी महामार्गावर होत आहे. बुधवारी, ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून साहजिकच शनिवारपासूनच अनेक चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहानांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

...म्हणून मुंबईत पालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराला मोठी कात्री; ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या प्रकाराने नाराजी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शुक्रवारी मुंबई-पुणे महामार्गावर किवळे ते सोमाटणे या मार्गादरम्यान दोन तास वाहतूककोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

महत्वाचे लेख