अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेही झाले विद्यार्थी, खुर्चीवर न बसता बसले बेंचवर, म्हणाले...

5G Launch : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावे वेळी बेंचवर बसून मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2022, 4:48 pm

हायलाइट्स:

  • देशात झाला फाईव्ह जी नेटवर्कचा राष्ट्रव्यापी शुभारंभ.
  • मुख्यमंत्री शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.
  • मुख्यमंत्र्यांनी सांगितले फाईव्ह जीचे महत्त्व.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm eknath shinde interacted with students
विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेही झाले विद्यार्थी
मुंबई : फाईव्ह जी नेटवर्कच्या (5G Network) राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath Shinde) शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जीचे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (cm eknath shinde interacted with students)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे 'टायमिंग' साधणार; ठाकरेंना कसा शह देणार? प्लानिंग ठरलं
प्रधानमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचची बसण्यासाठी निवड केली. मीही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पनवेल राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच प्रधानमंत्र्यांचे देखील आभार मानले. या नविन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाईव्ह जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल अशी माहिती दिली. यावेळी सादरीकरण करताना सिंग यांनी टेलीकॉम तंत्रज्ञानाचा वन जी ते फाईव्ह जी असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाईलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वताच्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही सिंग यांनी यावेळी केले.

९० दिवसांत मुंबईचा कायापालट करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख