मुंबई: आज गुढीपाडवा आणि नववर्षाच्या दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. ते आज लॉकडाउनची (Lockdown in Maharashtra) घोषणा करतील असे मानले जात आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील मुख्यमंत्री आज लॉकडाउनची घोषणा करतील असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नेमके काय म्हणतात हे लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून जाणून घेऊ या... (cm uddhav thackeray interaction with people of maharashtra through facebook live) Live अपडेट्स...
>> राज्यातील करोना बाधित रुग्णांना आपण ४० ते ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देत आहोत- मुख्यमंत्री.
>> ५ हजार ४०० कोटी रुपयांचा हा निधी आधार देण्यासाठी आणि औषधोपचार आणि सुविंधा देण्यासाठी बाजूला काढून ठेवत आहोत- मुख्यमंत्री.
>> परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपये देणार- मुख्यमंत्री.
>> नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही पैशांची मदत करणार- मुख्यमंत्री.
>> फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा.
>> पेट्रोलपंप आणि कार्गोसेवा सुरू राहणार.
>> हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहणार, मात्र पार्सल सेवा सुरू राहणार
>> गरिबांना पुढील महिनाभर मोफत शिवभोजन देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
>> राज्यातील जनतेला निर्बंधाच्या काळात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देणार, ७ कोटी लोकांना होणार लाभ- मुख्यमंत्र्यांची घोषणा.
>> ब्रेक द चेन: राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याची मुभा.
>> सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जसे बससेवा, ट्रेन सुरू राहणार, फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच- मुख्यमंत्री.
>> सकाळी सात ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
>> अतिआवश्यक काम नसेल तर कुणीही घराबाहेर पडू नये, मुख्यमंत्री ठाकरेंची आवाहन.
>> उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेन मोहीम सुरु
>> ब्रेक द चेन: उद्यापासून राज्यात १४४ कलम लागू. पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी, अनावश्यक येणंजाणं पूर्णपणे बंद.
>> लॉकडाउनऐवजी मुख्यमंत्र्यांची कडक निर्बंधांची घोषणा.
>> निवृत्त झालेल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांना करोनाच्या संकटकाळात सेवा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
>> राज्यात ऑक्सिजनची मोठी निकड, केंद्राने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्यासाठी हवाईदलाशी बोलावे, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती.
>> इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितील आहे- मुख्यमंत्री.
>> गेले अनेक दिवस मी अनेक घटकांशी चर्चा केली. आता चर्चा करण्याची वेळ गेली आहे- मुख्यमंत्री.
>> राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी १००० मेट्रिक टन ऑक्सिजन कोरोना रुग्णासाठी वापरला जातो- मुख्यमंत्री.
>> राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. करोनाच्या उद्रेकामुळे राज्यातील आरोग्य सुविथांवर
>> आज राज्यात सर्वाधिक ६० हजार २१२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती.
>> करोनाविरोधातील युद्धाला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे- मुख्यमंत्री.
>> मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या दिल्या शुभेच्छा
>> उद्धव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद सुरू
>> मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राज्यातील जनतेशी संवाद साधणार.
>> राज्यात लॉकडाऊन रिटर्न: नेमकं काय बंद आणि काय सुरू राहू शकतं? (क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)
>> मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन घोषित केल्यास तो किती दिवसांचा असेल?, तो दोन आठवड्यांचा असेल का?... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाउनची घोषणा करतील अशी माहिती पालकमंत्री शेख यांनी दिली होती. राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्यााबाबतची संपूर्ण तयारी राज्य सरकारने केली असल्याचेही ते म्हणाले होते.
>> मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत राज्यात लॉकडाउन लागू करण्याती आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
>> महाविकास आघाडी सरकारवर अनेक मंत्र्यांनी लॉकडाउन घोषित होण्याची शक्यता वर्तवली असून आज मुख्यमंत्री ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने ही माहिती दिली आहे.