अ‍ॅपशहर

वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम

महानगरातील विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे ओढा असतो. मात्र, वाणिज्य शाखाच का? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनेकांकडे नसते. वाणिज्य शाखेमध्ये उद्योग, व्यापाराच्या व्यवस्थापनाशी निगडित विषयांचा समावेश केलेला असतो. यामध्ये अकाऊंटिंग, मनुष्यबळ विकास, आयात-निर्यात व्यवस्थापन, मॅनेजमेंट, चिटणीसाची कार्यपध्दती यासारख्या विषयांचा अंतर्भाव केलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाणिज्य शाखेमध्ये विविध विषयांतील स्पेशलायझेशन असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

Maharashtra Times 30 May 2016, 8:00 am
आनंद मापुस्कर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम commerce courses
वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम


महानगरातील विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे ओढा असतो. मात्र, वाणिज्य शाखाच का? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनेकांकडे नसते. वाणिज्य शाखेमध्ये उद्योग, व्यापाराच्या व्यवस्थापनाशी निगडित विषयांचा समावेश केलेला असतो. यामध्ये अकाऊंटिंग, मनुष्यबळ विकास, आयात-निर्यात व्यवस्थापन, मॅनेजमेंट, चिटणीसाची कार्यपध्दती यासारख्या विषयांचा अंतर्भाव केलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाणिज्य शाखेमध्ये विविध विषयांतील स्पेशलायझेशन असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

वाणिज्य शाखेतील

पदवी अभ्यासक्रम

पारंपरिक बी. कॉम अभ्यासक्रमांच्या बरोबरीनेच मुंबई विद्यापीठामध्ये वाणिज्य शाखेमध्ये चार नवीन अभ्यासक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आले आहेत.

बी. कॉम. (अकाऊंटन्सी अँड फायनान्स)

हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये मॅनेजमेंट अकाऊंटिंग, फायनान्शियल अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटिंग या विषयांचा समावेश होतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस मॉडेलिंग आदीबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळते.

बी. कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स)

हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. बँकिंग व्यवसायाचे क्षेत्र अधिकाधिक विस्तारताना आपल्याला बघायला मिळते. अनेकानेक सुविधा, ऑनलाइन ट्रेडिंग, विमा आदी सेवा बँका देत आहे. विमा क्षेत्रातही अनेक खासगी कंपन्या उतरल्या आहेत. या दोन्ही क्षेत्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा बी. कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स) हा अभ्यासक्रम आहे.

बी. कॉम. (फायनान्शियल मार्केट्‍स)

गेल्या दोन दशकांपासून जागतिक अर्थ क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. याविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने बी. कॉम.(फायनान्शियल मार्केट्‍स) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये प्रोजेक्टस, केस स्टडीज, इंडस्ट्रीयल व्हिजिट्स तसेच समर इंटर्नशिप आदींचा समावेश असतो.

बीएमएस (बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज)

हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात उपलब्ध आहे. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी १२वीनंतर या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. तसेच इंजिनीयरिंग डिप्लोमाचे वा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनशी संलग्न डिप्लोमाचे विद्यार्थीदेखील या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन)

मुंबई विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांमध्ये पदवीस्तरावरील मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला बीबीए म्हणतात.

या चारही अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना आपण काही मुद्द्यांचा विचार केला पाहिजे.

१) हे अभ्यासक्रम विशिष्ट क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या क्षेत्रात खरोखरच आपल्या रस आहे का हे पहाणे गरजेचे ठरेल.

२) महाविद्यालयात प्रवेश घेताना या विषयांसाठी अनुभवी फॅकल्टी आहेत का, व सर्व विषय शिकवण्यासाठी शिक्षक आहेत का, या खात्री करुन घ्यावी.

३) प्लेसमेंटबाबत माहिती घ्यावी. संस्थेच्या दर्जाबाबत खात्री करूनच प्रवेश घ्यावा.

(लेखक करिअर मार्गदर्शक आहेत) anandmapuskar@gmail.com

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज