अ‍ॅपशहर

बालहट्टामुळं पेंग्विनचा मृत्यू: नितेश राणे

बालहट्टामुळं राणीच्या बागेतील पेंग्विनचा मृत्यू झाला आहे, असं ट्विट करत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज सकाळीच जीवाणूचा संसर्ग झाल्यानं पेंग्विनचा मृत्यू झाला होता.

Maharashtra Times 23 Oct 2016, 8:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cong mla nitesh rane slams aditya thackeray over penguin died
बालहट्टामुळं पेंग्विनचा मृत्यू: नितेश राणे


बालहट्टामुळं राणीच्या बागेतील पेंग्विनचा मृत्यू झाला आहे, असं ट्विट करत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज सकाळीच जीवाणूचा संसर्ग झाल्यानं पेंग्विनचा मृत्यू झाला होता.

'बालहट्टामुळं एका पेंग्विनचा मृत्यू' असं ट्विट राणे यांनी केलं आहे. त्यासोबत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेलं पत्रक जोडलं आहे.


बाल हट्टामुळे एक penguin चा मृत्यू pic.twitter.com/8hTbdVxPtj — nitesh rane (@NiteshNRane) October 23, 2016
महापालिकेनं सेऊलमधील कोएक्स एक्चेरिअममधून ३ नर आणि ५ मादी जातीचे असे आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. त्यांना राणीच्या बागेतील सोइसुविधांयुक्त क्वारंटाइन क्षेत्रात ठेवलं होतं. १८ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास त्यातील एका पेंग्विनला (मादी) श्वसनाचा त्रास जाणवू लागला. ती सुस्त पडली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही चाचण्या केल्या. त्यात कल्चर सेन्सिटिव्हीटी चाचणीही करण्यात आली आहे. त्यात जिवाणूचा (एन्रोफलॉक्सेसिन) संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पेंग्विन पक्ष्यांच्या आरोग्य आणि देखभालीचा अनुभव असलेल्या विदेशी पक्षीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. गेल्या पाच दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर आज सकाळी सव्वाआठ वाजता पेंग्विनचा मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज