अ‍ॅपशहर

पवारांनी पुढाकार घेतलाय; भाजपचं सरकार येणार नाही: दलवाई

राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुढे जाऊ. मात्र, राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2019, 4:07 pm

आम्ही जबाबदार विरोधी पक्षाचे काम करू: पवारांची भूमिका

मुंबई: राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुढे जाऊ. मात्र, राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेचा पेच निर्माण झालेला असतानाच पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्यानेही काँग्रेस-शिवसेनेचे सूर जुळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raut-dalwai


राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना पहिल्यांदाच काँग्रेसच्यावतीने हुसेन दलवाई यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. भाजपने राज्याच्या विकासाची आणि अर्थकारणाची वाट लावली आहे. त्यामुळे सामाजित दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे सरकार येऊच नये अशी काँग्रेसची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही. याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा, असं दलवाई म्हणाले. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये, या माझ्या विधानात बराच अर्थ दडलेला आहे. त्यात सर्व काही आलंय. कोणत्याही परिस्थिती भाजपचा मुख्यमंत्री नकोच, असं सांगतानाच भाजपला सरकार सत्ता स्थापनेचा अधिकारच नाही. त्यांनी विरोधी पक्षातच बसावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

वाघ कुठलाही असो, संवर्धन होणारच:मुनगंटीवार

राष्ट्रपती राजवट लागू देणार नाही

भाजपने राज्याची वाट लावली आहे. नेते आणि आमदारांना ईडीची भीती दाखवून धमकावले आहे. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू देणार नाही, असा इशारा देतानाच जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यांनी खुशाल सरकार बनवावं, असंही ते म्हणाले.

संजय राऊत पवारांच्या घरी; तर्कवितर्कांना ऊत

शिवसेनेचं हिंदूत्व वेगळं

भाजपपेक्षा शिवसेना कधीही चांगलीच आहे, हे मी नेहमीच सांगत आलोय. हे माझं आजचं विधान नाही. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वामुळे एकत्र आले. पण दोन्ही पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-आस्मानचा फरक आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील सध्याचं सरकार हे भाजपचं नव्हतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार होतं. स्वातंत्र्य काळात संघाने ब्रिटीशांना मदत केलीय, अशी टीकाही त्यांनी केली.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज