अ‍ॅपशहर

काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं! प्रत्येकी १२५ जागा लढणार

आमचं ठरलंय... असं म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेचं जागावाटपाचं गाडं अजूनही चर्चेच्या पातळीवर असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार आहेत. तर, मित्र पक्षांना ३८ जागा सोडणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज यावर शिक्कामोर्तब केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 3:31 pm
मुंबई: आमचं ठरलंय... असं म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेचं जागावाटपाचं गाडं अजूनही चर्चेच्या पातळीवर असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार आहेत. तर, मित्र पक्षांना ३८ जागा सोडणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज यावर शिक्कामोर्तब केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress ncp seal seat sharing pact for maharashtra vidhan sabha polls 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं! प्रत्येकी १२५ जागा लढणार


लोकसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला नंतरच्या पक्षांतरामुळं मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अडवणुकीची भूमिका न घेता दोन्ही पक्षांनी जागावाटपाचं सूत्र ठरवून टाकलं आहे. निम्म्या-निम्म्या जागा लढण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं एकमत झालं आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनीही त्यास दुजोरा दिला. पाच ते सात जागांची अदलाबदल करण्यात येणार असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असंही मलिक यांनी सांगितलं.

मुंबईत राष्ट्रवादीला सहा जागा

मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. अणुशक्ती नगर, कुर्ला, वरळी, दिंडोशी, मागाठणे, विक्रोळी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पैकी दिंडोशीची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती. ती राष्ट्रवादीने घेतली असून त्या बदल्यात गोरेगावची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज