अ‍ॅपशहर

मुख्यमंत्री राजकीय गुंडगिरीपुढे झुकले:काँग्रेस

'ऐ दिल है मुश्किल'वरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी 'वर्षा बंगल्या'वर मनसे आणि चित्रपट निर्मात्यांची बैठक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही मांडवली घटनाविरोधी आणि धक्कादायक आहे. राजकीय गुंडगिरीसमोर झुकून मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह राज्यालाही मान खाली घालायला लावली, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

Maharashtra Times 22 Oct 2016, 4:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress slams cm fadnavis on ae dil hai mushkil
मुख्यमंत्री राजकीय गुंडगिरीपुढे झुकले:काँग्रेस

'ऐ दिल है मुश्किल'वरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी 'वर्षा बंगल्या'वर मनसे आणि चित्रपट निर्मात्यांची बैठक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही मांडवली घटनाविरोधी आणि धक्कादायक आहे. राजकीय गुंडगिरीसमोर झुकून मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह राज्यालाही मान खाली घालायला लावली, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असल्यानं मनसेने प्रदर्शनाला विरोध केला होता. चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या मल्टीप्लेक्समध्ये तोडफोड करण्याचा इशाराही दिला होता. निर्मात्यांनी कोट्यवधी रूपये खर्चून तयार केलेल्या सिनेमाचे प्रदर्शन रोखण्याची धमकी देणे आणि त्यांची आर्थिक कोंडी करणे हे बेकायदेशीर आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घ्यायचा आहे. तशी मागणी मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करू शकतात. देशहित कशात आहे, हा परराष्ट्र नितीचा भाग असल्याने तो निर्णय मोदींच्या अधिकार क्षेत्रातला आहे. केंद्र सरकार हा निर्णय घेत नाही, तोपर्यंत कायदा-सुव्यवस्था राखणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. परंतु राजकीय गुंडगिरीसमोर मुख्यमंत्री झुकले असून, राज्यालाही मान खाली घालायला लावली, असं ते म्हणाले.

खासदार अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, शिवसेनेनंही अशाच प्रकारे अभिनेता शाहरूख खानच्या 'माय नेम इज खान' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. पण त्यांनी पोलीस संरक्षण देऊन चित्रपट प्रदर्शित करण्यास मदत केली होती. सरकार कोणत्याही दबावाखाली झुकत नाही आणि कायद्याने काम करते, हे दाखवून देण्याची काँग्रेस सरकारमध्ये असलेली धमक भाजप नेतृत्वाकडे नाही, असेही सावंत म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरत आहे, याची कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कृतीनं दिली आहे. त्यांनी अशा बेकायदेशीर घटनेचे साक्षीदारच नव्हे; तर पुरस्कर्ते व्हावे हे लोकशाहीसाठी मारक असून याचा तीव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज