अ‍ॅपशहर

टॉयलेटला नाव दिल्यानं ऋषी कपूर खुश

सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचं नाव देऊन त्यांना डिवचण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा डाव ऋषी कपूर यांनी आज त्यांच्यावरच उलटवला आहे. माझं नाव कुणाच्या कामी तरी येतंय, ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. याउलट, काँग्रेसचे लोक तर बिनकामाचे आहेत, असा टोला त्यांनी हाणलाय.

Maharashtra Times 25 May 2016, 6:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress workers name public toilet after rishi kapoor hes thrilled
टॉयलेटला नाव दिल्यानं ऋषी कपूर खुश


सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचं नाव देऊन त्यांना डिवचण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा डाव ऋषी कपूर यांनी आज त्यांच्यावरच उलटवला आहे. माझं नाव कुणाच्या कामी तरी येतंय, ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. याउलट, काँग्रेसचे लोक तर बिनकामाचे आहेत, त्यांचा कुणालाच उपयोग नाही, असा टोला त्यांनी हाणलाय.

'सगळीकडे गांधी-नेहरूंची नावे द्यायला बापाचा माल समजलात का?', असा सवाल ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. या ट्विटमुळे मोठं वादळ उठलं होतं. ऋषी कपूर यांना काँग्रेसनं लक्ष्य केलं होतं. कुठल्या वास्तूला कोणतं नाव असावं वा असू नये हे सांगणारे ऋषी कपूर कोण?, असा सवाल त्यांनी केला होता. देशाच्या विविध भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऋषी कपूर यांच्याविरोधात निदर्शनंही केली होती. त्याचाच एक भाग म्हणून, काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अलाहाबादमधील सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचं नाव दिलं होतं. सोलापुरातही तसा प्रकार घडला होता.

याबाबत ऋषी कपूर यांना विचारलं असता त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वच्छता अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. शौचालयाला माझं नाव दिल्यानं मी या अभियानाचा एक भागच झालोय आणि त्याचा मला अभिमानच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. किमान माझ्या नावाचा कुठेतरी उपयोग तरी होतोय, हे काँग्रेस कार्यकर्ते तर कुचकामीच आहेत, असंही त्यांनी सुनावलं. त्यामुळे आता काँग्रेस आणखी चिडण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज