अ‍ॅपशहर

ग्राहक मंचाचा विमा कंपनीला दणका

एका तक्रारदाराला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अॅन्जीओग्राफी व अॅन्जीओप्लॉस्टी या हृदयावरील उपचारापोटी आलेला सुमारे सात लाख रुपये खर्च नाकारणाऱ्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दोषी धरले आहे. तक्रारदारास ९ टक्के व्याजाने उपचाराची सर्व रक्कम देण्याचा आदेश दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने कंपनीला दिला आहे. तक्रारदार दीपक लाहोरी यांनी केलेल्या तक्रारीची मंचाचे अध्यक्ष जी. के. राठोड व सदस्य एस.आर. सानप यांच्यापुढे सुनावणी होऊन त्यांनी नुकताच हा निकाल दिला. अर्जदारासाठी अॅड. अविनाश मोरे व अॅड. एस. व्ही. गायकवाड यांनी , तर प्रतिवादी बजाज अलियान्झतर्फे अॅड. एस. आर. सिंग यांनी बाजू मांडली.

Maharashtra Times 16 Mar 2018, 5:27 am
  • सात लाखांचा उपचारखर्च व्याजासह देण्याचे आदेश
  • तक्रारदाराला दिलासा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम consumer forum orders insurance co to pay claim to customer
ग्राहक मंचाचा विमा कंपनीला दणका

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

एका तक्रारदाराला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अॅन्जीओग्राफी व अॅन्जीओप्लॉस्टी या हृदयावरील उपचारापोटी आलेला सुमारे सात लाख रुपये खर्च नाकारणाऱ्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दोषी धरले आहे. तक्रारदारास ९ टक्के व्याजाने उपचाराची सर्व रक्कम देण्याचा आदेश दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने कंपनीला दिला आहे. तक्रारदार दीपक लाहोरी यांनी केलेल्या तक्रारीची मंचाचे अध्यक्ष जी. के. राठोड व सदस्य एस.आर. सानप यांच्यापुढे सुनावणी होऊन त्यांनी नुकताच हा निकाल दिला. अर्जदारासाठी अॅड. अविनाश मोरे व अॅड. एस. व्ही. गायकवाड यांनी , तर प्रतिवादी बजाज अलियान्झतर्फे अॅड. एस. आर. सिंग यांनी बाजू मांडली.

तक्रारदार दीपक लाहोरी यांनी १४ सप्टेंबर, २०१३ ते १३ सप्टेंबर, २०१४ या कालावधीसाठी बजाज अलियीन्झची दहा लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी विकत घेतली होती. ७ नोव्हेंबर,२०१३ रोजी त्यांना छातीत दुखत असल्याने त्यांनी डॉ. राजेश रजनी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना आठ ते नऊ महिन्यांपासून उच्चरक्तदाब आणि मधुमेह असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयामध्ये १५ डिसेंबर, २०१३ रोजी अॅन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यासाठी त्यांना ७ लाख १८ हजार ६९६ रु. खर्च आला. पॉलिसी कॅशलेस असल्याने थेट पैसे मिळतील, अशी तक्रारदाराची अपेक्षा होती. मात्र कंपनीने ती नाकारल्याने तक्रारदाराला स्वतः वैद्यकीय खर्चाची रक्कम भरावी लागली.

मेडिक्लेम नाकारल्याने तक्रारदाराने कंपनीकडे दाद मागूनही कंपनीने ती नाकारली. प्रतिवादी कंपनीच्या दाव्यानुसार, तक्रारदारास पाच हे सहा वर्षांपासून उच्चरक्तदाब व मधुमेह होता. तसेच पॉलिसी घेतल्यानंतर चार वर्षानंतरच पॉलिसीधारकाला त्याच्या पूर्वीच्या आजारासाठी मेडिक्लेम लागू होत असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. तक्रारदाराने सादर केलेली कागदपत्रेही अस्सल नसल्याचा दावा कंपनीने केला आणि ते लक्षात घेऊनच मेडिक्लेम देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले.

ग्राहक मंचापुढे आलेल्या कागदपत्रांवरून तक्रारदारास मेडिक्लेम पॉलिसी घेण्यापूर्वी आजार असल्याचा कोणताही पुरावा मंचापुढे सादर करण्यात आलेला नव्हता. त्याशिवाय तक्रारदारास कोणताही पूर्वआजार नव्हता, असेही मंचाने त्यांच्या निकालात स्पष्ट केले आहे.

एक महिन्यात अंमलबजावणी

सर्व मुद्दे विचारात घेऊन तक्रारदारास २३ ऑगस्ट, २०१४ पासून ९ टक्के व्याजाने त्यांची मेडिक्लेमची ७ लाख १८ हजार ६९६ रुपये रक्कम बजाज अलियान्झ कंपनीने द्यावी, असे आदेश ग्राहक मंचाने दिले. त्याशिवाय तक्रारदारास झालेला मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी एकूण पाच हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्यात यावी, असाही आदेश ग्राहक मंचाने कंपनीला दिला. आदेशाची एक महिन्यात अंमलबजावणी करण्यास बजावण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज