अ‍ॅपशहर

दिल्लीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट? सरकारनं केलं 'हे' आवाहन

दिवाळी सण, हिवाळा या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेत असलेल्या सार्वजनिक आरोग्याच्या खबरदारीविषयी माहिती घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2020, 1:30 pm
मुंबईः भारतात करोना व्हायरस संक्रमणाचा आकडा खाली येत आहे. तर, अनेक राज्यांमध्ये करोना संसर्गाची संख्या घटत आहे परंतु, दिल्लीत मात्र करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी पहिल्यांदाच ८ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहे. करोना रुग्णांच्या या आकडेवारीनुसार दिल्ली सरकारनं ही करोनाची दुसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीनंतर महाराष्ट्रातही करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus cases increase in new delhi cause of worry maharashtra may witness second wave after diwali
दिल्लीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट? सरकारनं केलं 'हे' आवाहन


दिल्लीत सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ व महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. आता महाराष्ट्रात दिल्लीच्या तुलनेनं कमी रुग्णसंख्या आहे. मागील २४ तासांत भारतात ४७ हजार ९०५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, ५५० करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९२. ८९ टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका

जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. करोनाची दुसरी लाट राज्यात येऊ नये म्हणून राज्य सरकारकडून आतापासून ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य प्रशासनानं सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, करोना उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. प्रत्येक रुग्णालयास्तरावर इन्स्टिट्युशनल डेथ ऑडीट कमिटी स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दिवाळी सण, हिवाळा या पार्श्वभूमीवर पुन्हा करोना संसर्गा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळं राज्य सरकारकडून दिवाळी फटाके न फोडण्याचे आवाहन केले जात आहे. प्रदुषणामुळं करोनाचा विषाणू अधिक संसर्ग पसरवण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे.

राज्य सरकारकडून उपाययोजना

राज्यातील उपचाराधीन केसेस कमी झाल्या आहेत. सध्या ९२ हजार रुग्ण उपचाराखाली असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज