अ‍ॅपशहर

शिवभोजन थाळी पुढील ३ महिने ५ रुपयांत मिळणार

राज्य सरकारनं गरीब, गरजू आणि कष्टकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने शिवभोजन थाळी अवघ्या पाच रुपयांत देण्याचा निर्णय सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2020, 8:39 pm
मुंबई: शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv bhojan thali


सध्या जिल्हा स्तरावर ही शिवभोजन केंद्रे चालवली जातात. आता तालुका स्तरावर सुरू होतील. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर पाच रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून, ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. या शिवभोजन केंद्र चालकांना देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

राज्य चिंताग्रस्त! आणखी १५० करोनाग्रस्त; एकूण १,०१८ रुग्ण

लॉकडाऊनसंबंधी निर्णय स्थिती पाहून: CM

'करोना संशयिताच्या मृतदेहाचे विच्छेदन नको'

केशरी कार्डधारकांना सरकारचा मोठा दिलासा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज