अ‍ॅपशहर

'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव

करोनाच्या विषाणूची सर्वात आधी बाधा झालेले पुण्यातील दाम्पत्यानं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसंच, सूचनांचं पालन करा, असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 5:02 pm
मुंबई: पुण्यातील पहिले करोनाग्रस्त दाम्पत्य रोगमुक्त झाले असून त्यांना आजच नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरी परतलेल्या या दाम्पत्यानं नायडू रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारे पत्र लिहिले असून राज्यातील जनतेसाठीही एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Letter


Live: एसी बंद करा, चला हवा येऊ द्या - सीएम

आपल्या पत्रात ते लिहितात, ३ मार्च रोजी आम्ही आरोग्य तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल झालो. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आमच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून आम्ही डॉक्टरांच्या सूचनांचे व रुग्णालयाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. तब्बल १४ दिवस उपचार झाल्यावर १५ व्या व १६ व्या दिवशी आमची पुन्हा चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यानं आम्हाला आज घरी सोडण्यात आलंय.'

संघानं कामाला सुरुवात केलीय: मोहन भागवत

पत्रातून या दाम्पत्यानं सर्वांना संदेशही दिला आहे. 'आम्ही करोनापासून मुक्त झालो आहोत. इतर रुग्णही बरे होतील याची खात्री आहे. मात्र, त्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व इतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्या सूचना करतात, त्यांचं पालन केलं तर आपण ह्या रोगाला हरवू शकतो,' असा विश्वास या दाम्पत्यानं व्यक्त केला आहे. नायडू रुग्णालयातील आरोग्य सेवेचं कौतुक करतानाच अशीच सेवा सर्वांना मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा: घरात बसून काय करता?; शरद पवार म्हणाले...

वाचा: 'हातावर पोट असलेल्यांना महिनाभराचा शिधा मोफत द्या'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज