अ‍ॅपशहर

देश मंदीच्या कचाट्यातून बाहेर येईलः मुख्यमंत्री

'अशिक्षा, असंस्कार, अनाचार छोडो, नये विचारोसे नया भारत जोडो,'असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईला शुक्रवारी दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली तरी देशांतर्गत परिस्थिती उत्तम असून येत्या तीन ते सहा महिन्यांत देश आर्थिक प्रगतीत पुन्हा आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 7 Sep 2019, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः 'अशिक्षा, असंस्कार, अनाचार छोडो, नये विचारोसे नया भारत जोडो,'असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईला शुक्रवारी दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली तरी देशांतर्गत परिस्थिती उत्तम असून येत्या तीन ते सहा महिन्यांत देश आर्थिक प्रगतीत पुन्हा आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm


सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांसमोर त्यांनी देशातील युवा पिढीकडून असलेल्या अपेक्षांची मांडणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. राज्याने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात मुंबईची मोठी भूमिका असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे करत असताना राज्यातील ४० हजार गावांमध्ये विकास करायचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणातूनच हे साध्य होणार आहे. भारतात आलेल्या काही लोकांचे नागरिकत्व रद्द केल्यासंदर्भातही एका विद्यार्थिनीने यावेळी प्रश्न विचारला, तिला उत्तर देताना एनआरसीअंतर्गत केल्या गेलेल्या कारवाईबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, देशात अधिकृतपणे प्रवेश घेऊन येणाऱ्या नागरिकांचे देश नेहमीच स्वागत करतो, मात्र अनधिकृतपणे देशात येऊन देश विघातक कृत्य करणाऱ्यांना देशात थारा नाही.

जगभरात आर्थिक मंदीविषयी तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, देशात आणि राज्यात उद्योगस्नेही धोरण आखण्यात आले आहे. नविन, सर्वंकष टॅक्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. बॅन्क सॉल्व्हन्सी प्रणालीत सुधारणा करून त्यातील अडचणी दूर करण्याबरोबरच पारदर्शकता आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक परिस्थीती आटोक्यात असून येत्या तीन ते सहा महिन्यात देश आर्थिक क्षेत्रात पुन्हा भरारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज