अ‍ॅपशहर

अंमली पदार्थ तस्करी; जोडपे अटकेत

शहरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या जोडप्यासह अन्य दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. गीता शेख आणि मुनीर ऊर्फ राजा शेख अशी जोडप्याची नावे आहेत, तर त्याच्यासोबत जुबेदा ऊर्फ चट्टी मुस्तफा शेख आणि मोहम्मद ऊर्फ लंगडा अली यांना कांदिवली युनिटने जेरबंद केले आहे.

Maharashtra Times 23 Jun 2017, 2:52 am
मुंबई : शहरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या जोडप्यासह अन्य दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. गीता शेख आणि मुनीर ऊर्फ राजा शेख अशी जोडप्याची नावे आहेत, तर त्याच्यासोबत जुबेदा ऊर्फ चट्टी मुस्तफा शेख आणि मोहम्मद ऊर्फ लंगडा अली यांना कांदिवली युनिटने जेरबंद केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम couple arrested for smuggling drugs
अंमली पदार्थ तस्करी; जोडपे अटकेत


मालाडच्या अशिना डॉग रुग्णालयाजवळ काही जण गांजाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिट-५चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी आरोपी गीता शेख आणि जुबेदा घटनास्थळी अंमली पदार्थ घेऊन उभ्या होत्या, तर मुनीर आणि मोहम्मद अंमली पदार्थ घेऊन येत होते. ते पोहोचताच माने यांच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या चौघांजवळून दोन लाख ३० हजारांचा २३ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार असून या आधीही सर्वांवर अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज