अ‍ॅपशहर

मुंबईत रेड लाइट एरिया कुठे आहे?; रिक्षाचालकाला विचारताच यूपीतील जोडपे गजाआड, वाचले १८ वर्षीय मुलीचे आयु्ष्य

Mumbai Crime News : मुंबईत एका वेश्यालयात विकण्यासाठी आणलेल्या एका १८ वर्षीय मुलीची सुटका टिळकनगर पोलिसांनी केली. उत्तर प्रदेशातील एका जोडप्याने या मुलीला ४० हजार रुपयांत विकण्यासाठी आणले होते.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2023, 9:15 pm
मुंबई : मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याने एका १८ वर्षीय मुलीला मुंबईतील एका वेश्यालयात विकण्यासाठी आणले होते. या जोडप्याला अटक केल्यानंतर सुटका करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सुटका करण्यात आलेल्या या मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Crime news (File Photo)
मुंबई गुन्हेगारी


या जोडप्याने आतापर्यंत अशा किती मुलींना वेश्यागृहांमध्ये विकले आहे याचा तपास आता पोलीस घेत आहेत. आंचल शर्मा (२०) आणि अमन शर्मा (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील खालिसपूर या गावातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी अमन शर्मा हा या मुलीला आझमगढमध्ये भेटला होता. त्याने आपण अविवाहित असल्याचे त्या मुलीला सांगितले आणि लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तो तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत राहिला. त्यानंतर आपण घरातून पळून मुंबईला जाऊ आणि तिथे लग्न करू असे तिला म्हणाला. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून १८ मे या दिवशी ति त्याच्यासोबत मुंबईला निघाली.

प्रेमाच्या जाळ्यात ओढत विवाहित शिक्षिकेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत दागिनेही केले हडप
त्याने आपल्या सोबत आपल्या पत्नीलाही घेतले होते. ही माझी वहिनी आहे असे त्याने मुलीला सांगितले. आपण लग्न केल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी वहिनीला सोबत आणल्याचे तो म्हणाला. अशा प्रकारे २० मे रोजी तिघेजण मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर उतरले.

त्यानंतर अमनने दोघांना सांगितले की तुम्ही रेल्वे स्थानकावर फ्रेश व्हा. त्यानंतर तो बाहेर गेला आणि तेथे उभ्या असलेल्या एका रिक्षा चालकाला विचारले की येथे जवळपास रेडलाइट एरिया कुठे आहे. एका मुलीला ४० हजार रुपयांत मला विकायचे आहे, असेही तो रिक्षा चालकाला म्हणाला. त्याने असे सांगितल्याबरोबर रिक्षा चालकाने तत्काळ टिळक नगर पोलीसांशी संपर्क आणि केला आणि माहिती दिली.

लोक बघतच राहिले! बीडमध्ये मुलाच्या आईवरील प्रेमाची चर्चा, स्मृती जपण्यासाठी केले जगावेगळे काम... पाहा व्हिडिओ
रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास राठोड यांनी पोलीस उपनिरीक्षक बबन हरळ यांना रेल्वे स्थानकावर पाठवले. हरळ हे त्या मुलीसह जोडप्याला घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहरण आणि मानवी तस्करीचे गुन्हे दाखल केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज