अ‍ॅपशहर

मुंबई: रेल्वे रुळाला तडे, हर्बर २५ मिनिटं उशिरानं

मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं हार्बर मार्गाची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीरानं धावत आहे. त्यामुळं सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरे जावं लागलं.

Maharashtra Times 10 Jan 2017, 9:26 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crack on rail tracks of mumbai harbour local near mankhurd
मुंबई: रेल्वे रुळाला तडे, हर्बर २५ मिनिटं उशिरानं

मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं हार्बर मार्गाची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीरानं धावत आहे. त्यामुळं सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरे जावं लागलं.

पहाटे ६ वाजून २५ मिनिटांनी मानखुर्द रेल्वे स्थानकाला तडे गेले. त्यामुळं पनवेलवरून सीएसटीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. रुळाला तडे गेल्याने हार्बर सेवा २५ मिनिटे धावत होती. त्यामुळे हार्बरच्या प्रत्येक रेल्वे स्थानकांवर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झाली होती. तब्बल पाऊण तासानं रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम पुर्ण करण्यात आलं, पण वाहतूक सुरळीत होण्यास अजून वेळ जाणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज