मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बेलापूर लोकल बेलापूरऐवजी वांद्रे येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज हार्बर मार्गावर घडला. रेल्वेच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
ही लोकल ९.३८ वाजता सीएसएमटी येथून निघाली होती. वडाळा स्थानकातून ही लोकल कुर्ला दिशेने पुढे न जाता वांद्रे दिशेने निघाल्याने लोकलमधील प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. नंतर वांद्रे-वडाळा-बेलापूर असा या लोकलचा प्रवास घडला.
दरम्यान, या प्रकाराबद्दल रेल्वेकडून प्रवाशांची दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.