अ‍ॅपशहर

क्रिकेटपटू संदीप पाटील यांना नोटाबंदीचा फटका

नोटबंदीनंतर राष्ट्रीयकृत बँकेतून लग्नासाठी पैसे काढण्यात अपयशी ठरलेल्या प्रमुख व्यक्तींच्या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे. पाटील यांच्या मुलाचे लग्न लवकरच होणार असून त्यासाठी त्यांना २.५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.

Maharashtra Times 22 Nov 2016, 1:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम currency demonetisation ex cricketer sandeep patil fails to get rs 2 5 lakh for sons wedding
क्रिकेटपटू संदीप पाटील यांना नोटाबंदीचा फटका


नोटबंदीनंतर राष्ट्रीयकृत बँकेतून लग्नासाठी पैसे काढण्यात अपयशी ठरलेल्या प्रमुख व्यक्तींच्या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे. पाटील यांच्या मुलाचे लग्न लवकरच होणार असून त्यासाठी त्यांना २.५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर कालांतराने सरकारने लग्नासाठी पैसे काढण्याच्या मर्यादेची रक्कमही जाहीर केली होती. त्यानुसार २.५ लाख रुपये काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर संदीप पाटील ती रक्कम काढू शकले नाहीत.

सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनीही स्वागत केले होते. मात्र त्यानंतर बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना मुलाच्या लग्नासाठी पैसे काढताना अडचण आली. संदीप पाटील यांच्यासारखाच अनुभव अंधेरीतील एका उद्योगपतीलाही आला होता.

याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. लग्ननासाठी २.५ लाख रुपये काढता यावेत आणि ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये पुरेशा नोटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखली जात असून क्षत्रिय स्वतः हा विषय अर्थ मंत्रालयापर्यंत नेणार असल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज