अ‍ॅपशहर

ट्विटरवर ट्रेंड होतोय #Dada; काय आहे या मागचं कारण?

ट्विटरवर ट्रेंड होणाऱ्या या हॅशटॅगमागचं कारण काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2020, 5:15 pm
मुंबईः सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल याचा काही नेम नाही. सध्या दादा हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. मात्र, अचानक हा हॅशटॅग का ट्रेंड होतोय याचं कोड सगळ्यानांच पडलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम twitter


आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटला अनेक नेत्यांपासून सर्व सामान्यांनी पसंती दर्शवली आहे. समाजात घडणाऱ्या चांगल्या- वाईट घटनांचे पडसाद ट्विटर हॅशटॅगच्या माध्यमातून उमटत असतात. सध्या ट्विटरवर दादा असा हॅशटॅग ट्रेंड होतोय. हा हॅशटॅग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासाठी होत आहे. अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित पवारांनी स्वतः ट्विट करून त्याबाबत माहिती दिली आहे. अजित पवारांच्या या ट्विटनंतर त्यांच्या समर्थक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

ट्विटरवर मोठ्या प्रमाणात अजित दादा पवार यांनी लवकरात लवकर करोनामुक्त व्हावे यासाठी प्रार्थना करणारे ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये आला आहे. यावरूनच अजित पवार यांची राज्यात किती लोकप्रियता आहे याचा अंदाज येतोय. विधानसभा निवडणुकीमध्येही अजित पवार हे राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आले आहेत.


थकवा आल्यामुळं व कणकण जावणत असल्यामुळं दोन ते तीन दिवसांपूर्वी अजित पवारांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, ती निगेटिव्ह आली होती. दरम्यान, त्यांची दुसरी करोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी एक ट्विटही केलं आहे. 'माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही,' असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज