अ‍ॅपशहर

​ दादर-सावंतवाडी विशेष गाडीस दिवा येथे थांबा

मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दादर ते सावंतवाडी विशेष गाडीला दिवा येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांची होणारी रखडपट्टी थांबणार आहे.

Maharashtra Times 18 Aug 2017, 4:01 am
मध्य रेल्वेचा गणेशभक्तांना दिलासा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dadar sawantawadi special railway to halt at diva
​ दादर-सावंतवाडी विशेष गाडीस दिवा येथे थांबा


म. टा. खास प्र​तिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दादर ते सावंतवाडी विशेष गाडीला दिवा येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांची होणारी रखडपट्टी थांबणार आहे. या गाडीला दिवा येथे थांबा देण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित होती.

मध्य रेल्वेवर दादर-सावंतवाडी (गाडी क्र. ०१११३) ​विशेष गाडी १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी दादरहून सकाळी ७.५० वाजता सुटणार आहे. ही गाडी सावंतवाडीला त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता पोहोचेल. या गाडीला दिवा स्थानकात सकाळी ८.३५ वाजता थांबा देण्यात आला आहे. परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्र. ०१११४) सावंतवाडी-दादर विशेष गाडीही १९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दर सोमवार, बुधवार, शनिवारी पहाटे ४.५० वाजता सुटून दादरला त्याच दिवशी दुपारी ४ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दिवा स्थानकात दुपारी ३ वाजता येणार असून या गाडीला ठाणे, दिवा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज