अ‍ॅपशहर

विधिमंडळात डान्सबार बंदी विधेयक मंजूर

राज्यात डान्स बार सुरू करण्यासाठी हॉटेल मालक, व्यवस्थापक, बारबाला आणि ग्राहकांवर अत्यंत कठोर नियम व मोठ्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक विधान परिषदेपाठोपाठ मंगळवारी विधानसभेत देखील एकमताने मंजूर करण्यात आले.

Maharashtra Times 12 Apr 2016, 10:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dancebar bill passed in maharashtra legislative assembly
विधिमंडळात डान्सबार बंदी विधेयक मंजूर


राज्यात डान्स बार सुरू करण्यासाठी हॉटेल मालक, व्यवस्थापक, बारबाला आणि ग्राहकांवर अत्यंत कठोर नियम व मोठ्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक विधान परिषदेपाठोपाठ मंगळवारी विधानसभेत देखील एकमताने मंजूर करण्यात आले.

या विधेयकाच्या मसुद्यानुसार विविध कलमांचे उल्लंघन झाल्यास वेगवेगळ्या शिक्षा व दंडाची तरतूद असून, किमान ३ महिने ते कमाल पाच वर्षे अथवा किमान ५० हजार ते कमाल २५ लाख रु. दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाचवेळी होऊ शकतात.

तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात निर्माण झालेला डान्स बार बंदी कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात डान्स बार सुरू होऊ नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षांचे मतैक्य होते. राज्य विधिमंडळाच्या उभय सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी डान्स बारच्या संदर्भात नवीन कठोर नियमावली केली. त्या मसुद्यात राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेतल्यानंतर महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यांवर बंदी घालणे व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ हे विधेयक दोन्ही सभागृहात क्षणार्धात मंजूर झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज