अ‍ॅपशहर

खडसे समर्थकांची मनीष भंगाळेच्या काकांना धमकी?

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील कथित फोन संभाषणाचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे व त्याच्या घरच्यांना जळगावातील भाजप कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा आरोप मनीषने केला असून तो या प्रकारानंतर भूमिगत झाला आहे.

Maharashtra Times 30 May 2016, 12:17 pm
मकरंद गाडगीळ । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dawood call controversy my kin getting threats says hacker who outed khadse
खडसे समर्थकांची मनीष भंगाळेच्या काकांना धमकी?

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील कथित फोन संभाषणाचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे व त्याच्या घरच्यांना जळगावातील भाजप कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा आरोप मनीषने केला असून तो या प्रकारानंतर भूमिगत झाला आहे.

२७ वर्षीय मनीष बडोद्यात राहत असला तरी त्याचं कुटुंब जळगावातलं आहे. तिथे त्याचे काका-काकी राहतात. त्यांना धमकावण्याच आले आहे. 'या प्रकरणाचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील', अशी धमकी रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या काका-काकींना दिली, असा आरोप मनीषने केला आहे. मात्र, मनीषचे हे आरोप खडसे यांनी फेटाळून लावले आहेत. हा मनीष भंगाळे कोण, हेच मला माहित नाही. त्याला मी ओळखत नाही, असे नमूद करताना अशा प्रकारची कोणतीही धमकी भाजप कार्यकर्त्यांनी दिलेली नाही, असे खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, खडसे-दाऊद कथित फोन संभाषणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका मनीषने मुंबई हायकोर्टात केली असून या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. मनीषने आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे याचिकेतही नमूद केले असून पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज