अ‍ॅपशहर

खडसे-दाऊद कथित कॉल प्रकरणी याचिका

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील कथित फोन संभाषणाचे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले आहे. या संभाषणाचा गौप्यस्फोट करणारा बडोद्यातील हॅकर मनीष भंगाळे याने कोर्टात याचिका दाखल करुन सीबीआयमार्फत 'फास्ट ट्रॅक' चौकशीची मागणी केली आहे.

Maharashtra Times 29 May 2016, 1:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dawood khadse call link vadodara hacker files pil against eknath khadse
खडसे-दाऊद कथित कॉल प्रकरणी याचिका


कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील कथित फोन संभाषणाचे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले आहे. या संभाषणाचा गौप्यस्फोट करणारा बडोद्यातील हॅकर मनीष भंगाळे याने कोर्टात याचिका दाखल करुन सीबीआयमार्फत 'फास्ट ट्रॅक' चौकशीची मागणी केली आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी खडसे-दाऊद कथित संभाषणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमत्र्यांकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशी करुन खडसे यांना क्लीन चीट दिली होती. चौकशीत असं कोणतंही संभाषण झाल्याचं आढळून आलेलं नाही, असे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या म्हणण्यावर ठाम राहत हॅकर मनीष भंगाळे याने आता कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

भंगाळे याने याप्रकरणी जलदगतीने सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. खडसे यांच्या मोबाइल नंबरवर दाऊदच्या घरातून वारंवार फोन आलेत आणि त्यांच्यात संभाषण झालेले आहे, हे १००१ टक्के सत्य आहे. माझ्याकडे त्या कॉललॉगचा पुरावा आहे. हे सर्व पुरावे हायकोर्टात सादर करण्यात आले आहेत, असे भंगाळे याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे मी १८ मे रोजीच दाऊदच्या कराचीतील घरातील फोनचे कॉल डिटेल्स दिलेले आहेत. मात्र, सबळ पुरावे देऊनही पोलिसांनी अद्याप ठोस अशी कारवाई केलेली नाही. खरं तर याप्रकरणी आतापर्यंत किमान गुन्हा तरी दाखल व्हायला हवा होता पण पोलिसांनी तेही केलेले नाही. उलट माझा इमेल आयडी वारंवार हॅक केला जात आहे. त्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भंगाळे याने केला आहे.

दरम्यान, भंगाळेच्या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज