अ‍ॅपशहर

​ पटवर्धन, कांबळे यांना दया पवार पुरस्कार

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१७ या वर्षासाठीचा दया पवार स्मृती पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समकालीन भारतीय चित्रकार सुधीर पटवर्धन आणि ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीच्या लेखिका शिल्पा कांबळे यांना जाहीर झाला आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 10:56 pm
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daya pawar award declared
​ पटवर्धन, कांबळे यांना दया पवार पुरस्कार

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१७ या वर्षासाठीचा दया पवार स्मृती पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समकालीन भारतीय चित्रकार सुधीर पटवर्धन आणि ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीच्या लेखिका शिल्पा कांबळे यांना जाहीर झाला आहे.

यंदा पुरस्काराचे २१वे वर्ष असून हा सोहळा बुधवार, २० सप्टेंबर रोजी ठाणे पालिका सभागृहातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रख्यात लेखक संजय पवार आणि चित्रकार सुधाकर यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली.

समकालीन भारतीय चित्रकला क्षेत्रात सुधीर पटवर्धन हे एक महत्त्वाचे चित्रकार मानले जातात. समाजाभिमुख कलाकार म्हणूनही ते ओळखले जातात. आयकर विभागात अधिकारी पदावर असणाऱ्या शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या पहिल्याच कादंबरीने साहित्य क्षेत्रात लक्ष वेधून घेतले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज