अ‍ॅपशहर

ई कॉमर्सलाही ‘डीडीओएस’चा फटका

मुंबईसह पुणे आणि ठाणे शहरातील इंटरनेवर झालेल्या ‘डीडीओएस या हल्ल्यामुळे ई कॉमर्सला सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी अनेक इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे ग्राहक घटले असून या हल्ल्याचे मूळ शोधण्यास सायबर सेलने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

Maharashtra Times 26 Jul 2016, 4:00 am
कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ddos
ई कॉमर्सलाही ‘डीडीओएस’चा फटका


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह पुणे आणि ठाणे शहरातील इंटरनेवर झालेल्या ‘डीडीओएस या हल्ल्यामुळे ई कॉमर्सला सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी अनेक इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे ग्राहक घटले असून या हल्ल्याचे मूळ शोधण्यास सायबर सेलने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबईसह ठाणे आणि पुण्यातील इंटरनेट सेवांवर घातक असा डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (डीडीओएस) चा हल्ला झाल्याचे वृत्त

महाराष्ट्र टाइम्सने सोमवारी सर्वप्रथम दिले होते. सध्या मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करीत असून या हल्ल्यामुळे युझरचा आयपी अॅड्रेस हॅक केला जात आहे. मुंबई आणि पुण्यातील इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या असंख्य ग्राहकांना त्याचा फटका बसला असून त्यांचे ग्राहक कमी होत आहेत. या हल्ल्यामुळे फटका बसलेली इंटरनेट सेवा अद्याप पूर्ववत झाली नसून इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपनींना करोडो रुपयांचा फटका बसला आहे.

याबद्दल बोलताना कायदेतज्ज्ञ अॅड प्रशांत माळी म्हणाले की, या हल्ल्यामुळे सर्वाधिक फटका ई कॉमर्सला बसला असून विविध प्रकारे माहिती मिळणाऱ्या स्रोतांना त्याचा फटका बसला आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील युझरला देखील याचा फटका बसला आहे. मात्र, अनेक इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपनी याविरोधात पुढे आलेल्या नाहीत. ‘ट्राय’ने आखून दिलेल्या नियमावलीनुसार आपल्याकडे नसलेल्या सामुग्री नसल्याचे यानिमित्ताने पुढे येणार असल्याने अनेक कंपन्या गप्प बसून असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज